गोव्यात दहावीचा निकाल ९१.२६ टक्के

अवित बगळे
शुक्रवार, 25 मे 2018

पणजी - गोव्यात आज दहावीचा निकाल जाहिर झाला. यात राज्याचा ९१.२७ टक्के एवढा निकाल लागला. गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर केला. मंडळाचे सचिव भगिरथ शेट्ये त्यावेळी उपस्थित होते.

मंडळाने ही परीक्षा गोव्यात २७ केंद्रांवर घेतली होती. दहावीच्या या परिक्षेला १९ हजार ५९६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १७ हजार ८८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. १० हजार ९३ विद्यार्थिनींपैकी ९ हजार ३३ म्हणजेच ९०.४९ टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या. १० हजार १६० विद्यार्थ्यांपैकी ९ हजार ९ म्हणजेच ८८.६९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

राज्यातील ७८ विद्यालयांचा निकाल शंभर टक्के आहे. यात २१ सरकारी शाळांचा तर ५७ अनुदानित शाळांचा समावेश आहे. गेल्या वर्षी ९१.५७ टक्के निकाल लागला होता. माने येथील परीक्षा केंद्राचा सर्वात जास्त ९६.६५ टक्के तर केले केंद्राचा सर्वात कमी निकाल ८१.६७ टक्के लागला. परीक्षेत ८ हजार ५१ विद्यार्थ्यांना क्रीडागुण मिळाले त्यापैकी ३७६ विद्यार्थी क्रीडागुणांमुळे उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ४.४ टक्के आहे.

Web Title: The result of 10th Class results in Goa is 1.22 percent