esakal | Bihar Election : दोन जागांचे निकाल जाहीर; जेडीयु, आरजेडीला प्रत्येकी एक जागा, राष्ट्रवादीला ४९ हजार मते
sakal

बोलून बातमी शोधा

Results for two seats in Bihar announced

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये एनडीए आणि युपीए यांच्यात कांटों की टक्कर सुरु आहे.

Bihar Election : दोन जागांचे निकाल जाहीर; जेडीयु, आरजेडीला प्रत्येकी एक जागा, राष्ट्रवादीला ४९ हजार मते

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये एनडीए आणि युपीए यांच्यात कांटों की टक्कर सुरु आहे. साकळी मतमोजणी सुरु झाली तेव्हा युपीए आघाडीर होती. मात्र, त्यानंतर युपीए मागे पडत एनडीए आघाडीवर गेली. यामध्ये जेडीयु व आरजेडीने आतापर्यंत एका- एका जागेवर विजयी मिळवला आहे.

दोघांच्याही जागा १०० च्यापुढे आहेत. त्यात एनडीए १२६ तर युपीए १०६ जागांवर आघाडीवर आहे. यात भाजपच्या ७४ म्हणजे सर्वाधीक जागा आघाडीवर आहेत. तर तेजस्वी यादव यांच्या आरजेडीच्या ६६, काँग्रेसच्या २० व नितिशकुमार यांच्या जेडीयूच्या ४९ जागा आघाडीवर आहेत. यात मताच्या टक्केवारीत आरजेडी आघाडीवर आहे. एकुण मतदानामध्ये राष्ट्रवादीला ०.२३ टक्के मते मिळाली आहेत. तर नोटाला १.७३ टक्के मते मिळाली आहेत. 

बिहारमध्ये मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरु झाली. सुरुवातीला काँग्रेससह जेडीयु व इतरपक्षांनी एकत्र येत केलेली महागठबंधन (युपीए) आघाडीवर होती. त्यानंतर काही वेळातच युपीए मागे पडत भाजप व जेडीयूसह इतर पक्षांची एनडीएन आघाडीवर आले. मंगळवारी ४ वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये आरजेडीला सर्वांधिक मते मिळाली आहेत. त्यांना ४,७५५,९८१ ऐवढी म्हणजे २२.९६ टक्के मते मिळाली. भाजपला ४,०८५,४०९ ऐवढी म्हणजे १९.७२ टक्के मते मिळाली आहेत.

जेडीयूला ३,२४१,७०५ ऐवढी म्हणजे १५.२५ टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेसला १,९९३,३३६ ऐवढी म्हणजे ९.३८ टक्के मते मिळाली आहेत. नोटाला ३६६,९८६ ऐवढी म्हणजे १.७३ टक्के मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीला ४८२४० ऐवढी म्हणजे १.७३ टक्के मते मिळाली आहेत.

निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार एमआयएमच्या चार, बहुजन समाज पार्टीच्या दोन, भाजपच्या ७७, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या तीन जागा आघाडीवर आहेत. आरजेडीची एक जागा विजयी झाली आहे.