esakal | ...तर कोरोनाचा उद्रेक, तिसरी लाट अधिक घातक; ICMR चा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

corona

...तर कोरोनाचा उद्रेक, तिसरी लाट अधिक घातक; ICMR चा इशारा

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नवी दिल्ली : कोरोना विषाणूची (coronavirus) दुसरी लाट ओसरली आहे. त्यानंतर जवळपास सर्वच ठिकाणी निर्बंध शिथिल झाले आहेत. मात्र, कोरोनाची तिसरी लाट (corona third wave) लवकरच येईल, असा इशारा आयसीएमआरने (ICMR) दिला आहे. फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असेल, असेही या संशोधनातून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: अमरावती जिल्हा बँक निवडणूक : बबलू देशमुखांना धक्का, बच्चू कडू विजयी

आयसीएमआर आणि इंपीरियल कॉलेज लंडन येथील संशोधकांनी संयुक्तरित्या अभ्यास केला असून पर्यटन भारतासाठी घातक ठरू शकते, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या अभ्यासानुसार भारतात २०२२ मध्ये फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक असेल, असेही म्हटले आहे. याबाबत ट्रॅव्हल मेडिसीन या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले असून पर्यटनामुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते का? याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार, संबंधित संशोधनामध्ये आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल बलराम भार्गव सहभागी आहेत. यामध्ये हिमाचल प्रदेशसारख्या राज्यातील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेची गणितीय मॉडेलच्या आधारे तुलना करण्यात आली आहे. त्यानुसार, कोरोनाची दुसरी लाट अधिक गंभीर आणि धोकादायक होती. मात्र, कमी लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये या लाटेचा जास्त परिणाम जाणवला नाही. मात्र, हिमाचलसारख्या पर्यटनक्षेत्रात शेवटी कोरोनाची रुग्णसंख्या अधिक होती.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे, हे खूप आशादायी आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यामुळे अनेकांनी पर्यटनाचा बेत आखला असून पर्यटनस्थळांवर गर्दी होत आहे. पर्यटनामुळे आर्थिक हातभार देखील लागत आहे. मात्र, हेच पर्यटन धोकादायक ठरू शकते. कारण, देशभरात केलेले पर्यटन हे नक्कीच तिसऱ्या लाटेला निमंत्रण देऊ शकते. लोकांचे पर्यटन असेल सुरू राहिले तर लवकरच तिसरी लाट धडकेल, असं आयसीएमआरने म्हटलं आहे. तसेच धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय सभा आदी कारणे देखील तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरू शकतात. तसेच या तिसऱ्या लाटेचा कालावधी चार आठवड्यांचा असू शकतो, असेही या शोधामध्ये सांगितले आहे.

loading image
go to top