
तामिळनाडुतील तिरुपूर इथं एका नवविवाहितेनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. २७ वर्षीय रिधान्यानं किटकनाशक गोळ्या खाल्ल्या. तिचा मृतदेह कारमध्ये आढळून आला. गारमेंट कंपनी चालवणाऱ्या अन्नादुरई यांची मुलगी रिधान्याचं एप्रिल महिन्यात कविनकुमार याच्याशी लग्न झालं होतं.