

Supreme Court
esakal
दिल्ली हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद आणि शर्जील इमाम यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. दोघांना या प्रकरणी आता वर्षभर जामीन अर्जही दाखल करता येणार नाही. गेल्या पाच वर्षांपासून युएपीए अंतर्गत दोघेही तिहार जेलमध्ये आहेत. न्यायालायने निर्णयात स्पष्ट म्हटलं की, सादर केलेली माहिती आणि पुराव्यांच्या आधारे दोघांविरोधात युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल आहे.