निवडणूकीनंतर सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलची दरवाढ

वृत्तसंस्था
बुधवार, 16 मे 2018

12 मे ला कर्नाटकची विधानसभा निवडणूक झाली, त्यापूर्वी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते. निवडणूक झाल्यानंतर लगेचेचे पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली.

नवी दिल्ली : गेले 19 दिवस स्थिर असलेले पेट्रोलचे दर हे कर्नाटक निवडणूकीनंतर पुन्हा वाढू लागले आहेत. निवडणूकीपासून सलग तिसऱ्या दिवशीही पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. कर्नाटकमध्ये मतदान झाल्यानंतर लगेचच तेल कंपन्यांनी दरवाढ करण्यास सुरवात केली आहे. पेट्रोलचे एकूण दर हे 46 ते 50 पैशांनी वाढले तर, डिझेलचे दर एकूण 48 ते 69 पैशांनी वाढले आहेत. 

आज (ता. 16) मुंबईत पेट्रोल 15 पैशांनी वाढले, तर डिझेल 22 पैशांनी वाढले. तर दिल्लीत पेट्रोल 15 पैशांनी व डिझेल 21 पैशांनी वाढले आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून ही नवीन दरवाढ लागू झाली आहे. सध्या मुंबईत पेट्रोल 82.94 रूपये प्रतिलीटर आहे, तर डिझेल 70.89 रूपये प्रतिलीटर या दराने उपलब्ध आहे. 

12 मे ला कर्नाटकची विधानसभा निवडणूक झाली, त्यापूर्वी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते. निवडणूक झाल्यानंतर लगेचेचे पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली. यापूर्वी गुजरात मध्येही निवडणूका झाल्यानंतर अशाच प्रकारची दरवाढ करण्यात आली होती.    

 

Web Title: rise in prices of petrol diesel on third day of karnataka elections