UP Election :कॉंग्रसचे तिकीट मिळण्यासाठी 'तिने' स्वत:वर झाडली गोळी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka gandi rita yadav
UP Election :कॉंग्रसचे तिकीट मिळण्यासाठी 'तिने' स्वत:वर झाडली गोळी!

कॉंग्रसचे तिकीट मिळण्यासाठी 'तिने' स्वत:वर झाडली गोळी!

सुल्तानपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना काळे झेंडे दाखविणाऱ्या महिलने प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी स्वत:वरच गोळीबार केल्याचे उघड झाले आहे. कॉंग्रेस पक्षाकडून तिकीट मिळावे, स्वत:चे महत्व वाढावे, म्हणून तीने हे कृत्य केले आहे. प्रियंका गांधींकडून (Priyanka Gandhi) आजच उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या वतीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे.यामध्ये 50 महिलांना संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा: उन्नाव पीडितेच्या आईला तिकीट, काँग्रेसची पहिली यादी जाहीर

चांदा कोतवाली भागातील लालू का पुरा सोनवन गावातील रहिवासी रिटा यादव (३५) पंतप्रधान नरेंद्र मोदी जिल्ह्यातील अर्वलकिरी रॅलीत पोहोचले तेव्हा प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. रिटा यादव यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते. यानंतर रीता यादव यांनी अमेठीमध्ये प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 3 जानेवारी रोजी रिटाने पोलिसांत धाव घेत आपल्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यावर खरे प्रकरण उघडकीस आले.

केले स्वत:वरच फायरिंग

3 जानेवारी रोजी रीटा यादव जीपने शहरात गेल्या होत्या. घरी परतत अशताना वाटेत तीन दुचाकीस्वारांनी जीपला ओव्हरटेक करून तिला थांबवल्यानंतर रिटा यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी रिटा यांच्या पायाला लागली होती. पोलिसांकडे तक्रार करत तिने गुन्हा दाखल केला होता. कॉंग्रेसनेही या मुद्याचं राजकारण करत योगी सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांच्या माहितीनुसार, रिटाने मोहम्मद मुस्तकीम, सूरज यादव रा. मानापूर, माधव यादव यांच्या सहकार्याने स्वत:वर गोळी झा़डली. रिटाबरोबर ते गाडीत होते. त्यानंतर फरार झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केल्यानंतर रिटासह तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून हत्यारं जप्त करण्यात आली आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top