

Karnataka River Drowning Accident news
esakal
women drowned in river : कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील तट्टे हक्कालू नदीत शिंपले (मसल्स) गोळा करण्यासाठी गेलेल्या गावातील आठ जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये सात महिलांचा समावेश असून, दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाह अचानक वाढल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत मदतीची घोषणा केली आहे.
शिराळी गावातील काही ग्रामस्थ रविवारी नदीत शिंपले गोळा करण्यासाठी उतरले होते. सुरुवातीला नदीतील पाणी कमी असल्याचे वाटत असतानाच अचानक पाण्याचा वेग वाढला. काही जण प्रवाहात वाहू लागल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी इतरांनीही नदीत उडी घेतली. मात्र, पाण्याचा वेग प्रचंड असल्याने बचावासाठी गेलेले लोकही प्रवाहात अडकले आणि एकामागोमाग अनेक जण बुडाले.
या दुर्घटनेत उमेश मंजुनाथ नाईक (वय ४०) यांच्यासह लक्ष्मी महादेव नाईक, लक्ष्मी जट्टप्पा नाईक, लक्ष्मी अप्पण्णा नाईक, लक्ष्मी शिवराम नाईक, ज्योती मस्तम्मा नाईक, मालती नाईक आणि मस्तम्मा नाईक यांचा मृत्यू झाला. मृतांपैकी सात महिला आहेत. पोलीस आणि बचाव पथकांनी आतापर्यंत आठ मृतदेह बाहेर काढले असून, दोन जणांचा शोध सुरू आहे. नागरत्ना आणि महादेवी या दोन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतांपैकी अनेक जण यापूर्वीही नदीत शिंपले गोळा करण्याचे काम करत होते. मात्र, यावेळी पावसामुळे नदीचा प्रवाह अचानक वाढल्याचा अंदाज त्यांना आला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत प्रत्येक मृताच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.
उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार (D. K. Shivakumar) आणि विरोधी पक्षनेते आर अशोका (R. Ashoka) यांनीही मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.