लालूप्रसाद यादव यांची 'पॅरोल' याचिका फेटाळली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पटणाः बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पॅरोल वाढवून मिळण्यासाठी केलेली याचिका झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळली असून, त्यांना 30 ऑगस्ट पर्यंत कारागृहात परतण्यास सांगितले आहे.

पटणाः बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पॅरोल वाढवून मिळण्यासाठी केलेली याचिका झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळली असून, त्यांना 30 ऑगस्ट पर्यंत कारागृहात परतण्यास सांगितले आहे.

लालूप्रसाद यादव यांच्यावर काही महिन्यांपासून मुंबई येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरू आहेत. ते 10 एप्रिल पासून पॅरोलच्या रजेवर आहेत. लालूप्रसाद यादव यांना उपचाराची आवश्यकता असल्याने पॅरोल रजा वाढवून मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने ती फेटाळली आहे. लालूप्रसाद यादव हे सध्या 70 वर्षांचे असल्याने ते विविध आजारांनी ग्रस्त आहेत. रांची येथील राजेंद्र इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात यापुढील उपचार करावे लागणार आहेत, असे लालूप्रसाद यादव यांचे वकिल प्रभात कुमार यांनी सांगितले.

दरम्यान, चारा घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने 23 डिसेंबरला लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवले. कोट्यवधींचा चारा घोटाळा केल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांच्यासह 22 जणांवर ठेवण्यात आला होता. मात्र, शिवपाल सिंग यांच्या न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांच्यासह 15 जणांना दोषी ठरवले आहे. तर जगन्नाथ मिश्रा यांच्यासह अन्य 7 जणांची निर्दोष मुक्तता केली.

Web Title: RJD chief Lalu Yadavs parole extension has been rejected by Court