esakal | 'पुत्रप्रेमातून बाहेर पडून पक्षाला वाचवा'; सोनिया गांधींना सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

sonia with rahul

खराब तब्येत असतानाही खूप अडचणींमध्ये सोनियाजी या कामचलाऊ अध्यक्षाच्या स्वरुपात कसेबसे पक्ष चालवत आहेत.

'पुत्रप्रेमातून बाहेर पडून पक्षाला वाचवा'; सोनिया गांधींना सल्ला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पाटना : राजदचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी महागठबंधनमधील आपला सहकारी पक्ष काँग्रेसवर कठोर टीका केली आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत असणारे शिवानंद तिवारी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना सल्ला दिलाय की त्यांनी पुत्रप्रेमाचा त्याग करुन देशहिताचा निर्णय घ्यावा. त्यांनी आरोप केलाय की, राहुल गांधी हे निरस नेते आहेत. त्यांच्यात लोकांना उत्साहित करण्याची क्षमता नाहीये. शिवानंद तिवारी फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी म्हटलं की जनतेला सोडा, त्यांच्या पक्षातील लोकांचाच त्यांच्यावर विश्वास नाहीये. त्यांनी म्हटलं की माझी ही वक्तव्ये राजद नेतृत्वापर्यंत पोहोचू शकतात मात्र लोकशाहीला वाचवण्यासाठी असं लिहायला मी भाग पडलो आहे. शिवानंद तिवारी यांनी काल शुक्रवारी काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर एक पोस्ट लिहली असून त्यामध्ये त्यांनी ही वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या या वक्तव्यांमुळे बिहारमधील राजकीय वातावरण गरम झालं आहे.

हेही वाचा - ओळख पटवल्याशिवाय लस नाही; QR Code-प्रमाणपत्र आणि एकूण अशी असेल यंत्रणा
त्यांनी पुढे म्हटलंय की, काँग्रेसची बैठक होणार आहे. त्या बैठकीतून काय निष्पन्न होईल माहित नाही. मात्र काँग्रेसचा सध्या कुणीही तारणहार नाहीये. खराब तब्येत असतानाही खूप अडचणींमध्ये सोनियाजी या कामचलाऊ अध्यक्षाच्या स्वरुपात कसेबसे पक्ष चालवत आहेत. मी त्यांचा आदर करतो. त्यांनी म्हटलं की, मला आठवतंय की सीताराम केसरी यांच्या काळात बुडणाऱ्या काँग्रेसला सांभाळून त्यांनी काँग्रेसला सत्तेपर्यंत पोहोचवलं. त्यांनी म्हटलं की 2004 मध्ये सोनियाजींच्या नेतृत्वात बहुमत मिळालं होतं. तसेच त्या पंतप्रधान पदाच्या स्वाभाविक हक्कदार होत्या. मात्र, त्यांनी पंतप्रधान न बनण्याचा असामान्य निर्णय घेतला.

राजद उपाध्यक्षांच्या या पोस्टवर काँग्रेस नेते प्रेमचंद मिश्रा यांनी हरकत घेतली आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रेमचंद मिश्रा यांनी म्हटलं की शिवानंद तिवारी राजदमध्ये आहेत मात्र काँग्रेसबाबत भाजपच्याच भाषेत वारंवार बोलतात. सहकारी पक्षाकडून याप्रकारच्या वक्तव्यांची अपेक्षा नाहीये. राजदने शिवानंद तिवारी यांना पक्षातून हाकलवून लावाव.

loading image