esakal | अनेक आजारांनी ग्रस्त असलेल्या लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक
sakal

बोलून बातमी शोधा

laluprasad.png

लालूप्रसाद यादव हे आधीच अनेक आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांची किडनी केवळ 25 ते 30 टक्केच काम करते. त्यांना मधुमेहही आहे.

अनेक आजारांनी ग्रस्त असलेल्या लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन टीम

रांची- चारा घोटाळाप्रकरणी कारावास भोगत असलेले आरजेडी सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांची प्रकृती गुरुवारी सायंकाळी अचानक बिघडली. त्यानंतर रिम्स प्रशासन आणि डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या बिघडलेल्या प्रकृतीवरुन त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन उपचारासाठी पॅरोलची मागणी करण्याबाबत चाचपणी करत आहेत. 

लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीबाबत रिम्सचे संचालक म्हणाले की, लालूप्रसाद यादव यांची प्रकृती स्थिर आहे आणि दिल्ली एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सातत्याने संपर्कात आहे. कृती बिघडल्यानंतर त्यांच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या आहेत. काहींचे रिपोर्ट आले आहेत तर काहींचे येणे बाकी आहेत. त्यांना निमोनिया आणि फुफ्फुसात इन्फेक्शन दिसून आल्यानंतर एक्स रे ही काढण्यात आला. त्याचबरोबर त्यांची कोरोना टेस्टही करण्यात आली आहे. 

हेही वाचा- मोठी बातमी! CBI ने Cambridge Analytica विरोधात दाखल केला गुन्हा

दुसरीकडे लालूंच्या प्रकृतीबाबत आरजेडी नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंता दिसून येत आहे. लालूप्रसाद यादव हे आधीच अनेक आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांची किडनी केवळ 25 ते 30 टक्केच काम करते. त्यांना मधुमेहही आहे. त्यामुळे लालूप्रसाद यादव यांचे वकील उच्च न्यायालयात त्यांच्या इलाजासाठी पॅरोलची मागणी करणारी याचिका दाखल करु शकतात. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी वकिलांशी चर्चा केली आहे. लालूप्रसाद यांची भेट घेण्यासाठी आरजेडी नेते आणि त्यांचे कुटुंबीय रांचीला येण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. कारागृह नियमावलीनुसार शनिवारी लालूप्रसाद यादव यांना तीन जणांना भेटण्याची परवानगी दिली जाते. 

हेही वाचा- उद्या मला मुख्यमंत्री व्हावं वाटेल, कुणी करणार का? शरद पवारांचा प्रश्न