रस्तेनिर्मितीचा गडकरींचा धडाका

Nitin-Gadkari
Nitin-Gadkari

चार वर्षांत ३१ हजार किलोमीटरचे काम
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये ‘करून दाखविले’ असे छातीठोकपणे सांगणाऱ्या अत्यल्प मंत्रालयांपैकी नितीन गडकरींच्या रस्ते व महामार्ग मंत्रालयाने गेल्या चारच वर्षांत यूपीए-२ सरकारच्या पाच वर्षांच्या तुलनेत मोठी झेप घेतली आहे. मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या चार वर्षांत सरासरी ३१ हजार किलोमीटर महामार्गांचे विक्रमी काम झाले असून, यूपीएच्या पाच वर्षांतील सुमारे २४ हजार किलोमीटरपेक्षा किमान २६ टक्‍क्‍यांनी जास्त आहे.

अर्थात दोन्ही सरकारांच्या काळात झालेल्या कामांत विद्यमान महामार्गांचे विस्तारीकरण, मजबुतीकरण व रुंदीकरण यांचे प्रमाण जास्त आहे. मात्र गेल्या चार वर्षांत नव्याने बांधलेल्या महामार्गांचे प्रमाण स्पष्टपणे जास्त आहे. मोदी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल तेव्हा ३९ हजार किलोमीटर महामार्ग बांधण्याचे लक्ष्य रस्ते व महामार्ग मंत्रालयाने ठेवले आहे. यूपीए सरकारपेक्षा हे प्रमाण तब्बल ६० टक्के जास्त असेल.

गडकरींकडून रोजच्या रोज देशभरातील कामांचा किलोमीटरनिहाय आढावा घेतला जात असल्याने त्यांच्या मोतीलाल नेहरू मार्गावरील निवासस्थानी रात्री-मध्यरात्री कधीपर्यंत बैठक चालेल, या धास्तीखाली मंत्रालयातील बाबूशाही झडझडून कामाला लागल्याचे चित्र आहे. २०१८-१९ मधील प्रस्तावित काम ७६ टक्के जास्त आहे. महामार्गांच्या मजबुतीकरणात मागील काळात झालेल्या निकृष्ट कामाची तपासणी व प्रचंड मोठ्या प्रमाणावरील दुरुस्ती, महामार्गांचे मजबुतीकरण, विस्तारीकरण व आगामी दहा वर्षांत त्या रस्त्यावर धावणाऱ्या वाहतुकीचा ताण पेलण्यासाठी तो महामार्ग सक्षम करणे या कामांचा समावेश आहे. टू-लेन योजनेत एकपदरी रस्त्यांचे काम किमान दुपदरी करण्यात येत आहे. देशात सध्या एकूण महामार्गांपैकी ७५ टक्के म्हणजे १.३ लाख महामार्ग संजाल या योजनेत समाविष्ट करून घेण्यात आले आहेत. मंत्रालयाच्या माहितीनुसार यूपीए-२ च्या काळात एकूण २४ हजार ४५५ किलोमीटर महामार्गांचे काम झाले, त्यातील किमान १६,५०० किलोमीटर मजबुतीकरण-रुंदीकरणाचा समावेश होता. गेल्या चार वर्षांत हे प्रमाण किमान २३,७५० किलोमीटरपर्यंत वाढले आहे. २०१७-१८ मध्ये या मंत्रालयाने चार लेन महामार्गांचे २२०० किलोमीटरचे काम पूर्ण केले व हा भारताच्या रस्तेबांधणीतील विक्रम मानला जातो. या वर्षी हे प्रमाण तीन हजार किलोमीटरपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com