NavIC Navigation App
ESakal
देश
NavIC: आता भारतीयांना रस्ता गुगल मॅप्स नाही, तर'नाविक' सांगणार; सरकारची नेमकी योजना काय?
NavIC Navigation App: आता गुगल मॅप्स नाही तर 'नाविक' प्रत्येक भारतीयाला मार्ग सांगणार आहे. तो त्यांच्या फोनमध्ये इन्स्टॉल केला जाईल. यामुळे काम आणखी सोपे होणार आहे.
लवकरच भारतातील प्रत्येक मोबाईल फोनमध्ये स्वदेशी नेव्हिगेशन सॉफ्टवेअर, नाविक, बसवले जाईल. सरकार प्रत्येक मोबाईल फोन कंपनीला त्यांच्या फोनमध्ये गुगल मॅप्स प्रमाणेच नाविक अॅप इनबिल्ट प्रदान करावे लागेल, असा नियम लागू करण्याचा विचार करत आहे. सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही की ते गुगल मॅप्सच्या जागी नाविक अॅप वापरणार की ते गुगल मॅप्सला पर्याय म्हणून उपलब्ध करून देणार.

