चांदीच्या पैंजणासाठी पाय कापून महिलेची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

चांदीच्या पैंजणासाठी पाय कापून महिलेची हत्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जयपूर : दरोडेखोराने चांदीचे पैंजण चोरण्यासाठी चक्क महिलेचा पाय कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील (Rajasthan crime) राजसमंद जिल्ह्यातील चारभुजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

हेही वाचा: मित्राच्या पत्नीवरच वारंवार बलात्कार, पतीला सोडण्यासाठी तगादा

कंकूबाई असं या मृत महिलेचं नाव असून त्या पतीसाठी जेवणाचा डब्बा घेऊन शेतात निघाल्या होत्या. मात्र, त्या शेतात पोहोचल्या नाहीत. खूप वेळ होऊन कंकूबाई शेतात का आल्या नाहीत? अशी चिंता त्यांच्या पतीला सतावत होती. त्यामुळे त्यांनी तत्काळ घर गाठले आणि पत्नीला शोधले. मुलांना देखील विचारणा केली. मात्र, आई सकाळीच शेतात गेल्याचे मुलांनी सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला. मात्र, त्या कुठेच सापडल्या नाहीत. त्यानंतर चारभुजा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर दुसऱ्यादिवशी पाय कापलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला. एका दरोडेखोराने चांदीच्या पैंजणासाठी महिलेचा पाय कापला असून आरोपीने महिलेच्या मानेवरही वार केले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे, अशी माहिती राजसमंदचे एसपी शिवलाल यांनी दिली.

पाय कापलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडण्याची ही पहिलीच घटना नाही. जयपूरमध्ये काही दिवसांपूर्वी शेतात गुरे चराईसाठी गेलेली एक महिला मृतावस्थेत आढळली होती. तिचे पायही कापले गेले होते आणि तिचे चांदीचे पैंजण गायब होते.

loading image
go to top