
विमानाने फिरून दरोडे टाकणाऱ्या चोराचा चेन्नईत एन्काउंटर करण्यात आला. तो कल्याणमधील इराणी वस्तीत राहत होता. आंबिवली परिसरातली इराणी वस्ती ही चेन स्नॅचिंग आणि चोऱ्या करणाऱ्या आरोपीमुळे कुप्रसिद्ध आहे. याच ठिकाणच्या आरोपीचा चेन्नईत पोलिसांनी एन्काउंटर केला. विमानाने परदेशात जाऊन टोळी दरोडा टाकायची. या टोळीच हा चोरटा होता. जाफर गुलाम इराणी असं एन्काउंटर झालेल्या चोराचं नाव आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.