प्रियांकांपाठोपाठ रॉबर्ट वद्राही राजकारणात?

Robert Vadra
Robert Vadra

नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई व कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वद्रा यांनी आज राजकारण प्रवेशाचे सूतोवाच केले. 

आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात मला गोवण्यात आले आहे. सध्या सुरू असलेली चौकशी संपली की देशवासीयांच्या सेवेसाठी त्यातही उत्तर प्रदेशातील जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे, अशी फेसबुक पोस्ट रॉबर्ट वद्रा यांनी केली आहे. 

सक्तवसुली संचालनालयातर्फे सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे. आपण आर्थिक गैरव्यवहार केला नसल्याचे त्यात त्यांनी पुन्हा एकदा नमूद केले आहे. 

देशातील मूळ समस्या आणि प्रश्नांपासून लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी गेल्या दशकभरापासून विविध सरकारे माझ्या बदनामीची कारस्थाने रचत आहेत. मात्र, या आरोपांत काहीच तथ्य नसल्याचे आता लोकांनाही कळून चुकले आहे. लोकांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच मी या सर्वांचा आभारी आहे, असे वद्रा यांनी फेसबुक पोस्टवर लिहिले आहे. 

दिल्ली, राजस्थान येथे सक्तवसुली संचालनालयासमोर चौकशीसाठी हजर राहिलो. आठ-आठ तास चौकशी झाली. प्रत्येक नियमांचे मी पालन केले. अर्थात मी किंवा अन्य कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, याची पूर्ण जाणीव मला आहे. या सगळ्याच गोष्टींतून मला बरेच काही शिकायला मिळाले, असेही वद्रा यांनी म्हटले आहे. 

वद्रा यांनी इंग्रजी आणि हिंदीतून ही पोस्ट लिहिली असून, केरळ आणि नेपाळमधील मदतकार्याचे काही फोटोही त्यांनी त्यासोबत शेअर केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com