कसलं भारी ना! रोबोट विकतोय 'कॉन्टॅक्टलेस पाणीपुरी, वडापाव

कसलं भारी ना! रोबोट विकतोय 'कॉन्टॅक्टलेस पाणीपुरी, वडापाव

भारतामध्ये सर्वात आवडते स्ट्रीट फूड कोणते असेल तर निर्विवादपणे पाणीपुरी हेच उत्तर मिळेल. भारतीयांना तळलेले आणि तिखट प्रकारातील सर्व खाद्यपदार्थ आवडतात. पण तरीही काही लोक स्वच्छतेचा विचार करुन हे पदार्थ खाणे टाळतात. पण तुम्हाला आता स्वच्छतेची चिंता करण्याची गरज नाही. कारण दिल्लीतील एका व्यक्तीने अशी वेंडिग मशीन तयार केली आहे जी विनासंपर्क (contactless) तुम्हाला पाणीपुरी देत आहे. ''पेमेंट पासून पाणीपुरीचे वाटप करण्यापर्यंत ही मशीन पूर्णपणे संपर्कविरहीत आहे'' असे हि वेंडिग मशीन तयार करणाऱ्या गोविंदने एका वृत्तसंस्थेला सांगितले. ''ही फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील अशी पहिली मशीन आहे''असेही त्यांने सांगितले

फुडी विशाल या फुडब्लॉगरने ही वेंडिग मशीन कशी काम करते याचा व्हिडिओ तयार केल्यानंतर ही मशीन व्हायरल झाली. ही मशीनच्या स्क्रिनवर पाणीपुरी आणि वडापावाची किंमत दर्शवली जात आहे. तुम्हाला फक्त QR code स्कॅन करायचा आहे आणि पेमेंट करायचे आहे. पेमेंट झाले की मशीन तुम्हाला पाणीपुरीचे बंद पॅकेट वितरित करते. या पॅकमध्ये एक ग्लास दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला, गोड, तिखट, हिंग आणि मिक्स असे वेगवेगळ्या फ्लेवरचे पाणी घेता येईल.

गोविंदने पुढे सांगितले की, ही मशीन तयार करण्यासाठी जे काही वापरले ते सर्व भारतात निर्माण केलेले आहे. बॅकएंडसाठी वापरले जाणारे क्लाऊडड सर्व्हर ते अॅप्लिकेशन आणि सॉफ्टवेअरपर्यंत सर्व काही भारतात बनवलेले आहे

ही मशीन फक्त पाणीपुरी किंवा वडापावापुरती मर्यादित नाही. तुम्ही कोणत्याही डिशसाठी वापरू शकता. ही अष्टपैलू मशीन आहे. असेही त्यांनी सांगितले.

गोविंद हा रोबोटिक्स इंजिनिअर असून दिल्लीमध्ये एक सायबर कॅफे चालवतोय. त्याने 2018 या मशीनवर काम करण्यास सुरूवात केली. पण वेळेअभावी तो ती पुर्ण करु शकला नाही. ''लॉकडाऊनच्या काळात मला खूर मोकळा वेळ मिळाला तेव्हा मी पुन्हा त्यावर काम सुरु केले.''असेही त्याने यावेळी बोलताना सांगितले.

व्हिडिओमध्ये AI पॉवर्ड बॉट देखील बसवलेला आहे, मशीनशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देत आहे.

या मशीनचे पहिले मार्च 2021मध्ये आले होते. ते टेस्टिंगच्या उद्देशाने लॉन्च करण्यात आले होते पण ते अल्पावधीतच प्रसिद्ध झाले आणि मला खूप सारे ऑडर्स मिळाले. आम्ही अलीकडेच त्याची व्यावसायिक व्हर्जन आणली आहे जी सर्वांनी पाहिली. व्हिडिओ लगेच व्हायरल झाला 8 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि असंख्य प्रतिक्रिया मिळाल्या.

एका नेटकऱ्याने लिहले आहे की, ते स्ट्रीड फुड आणि टेक्नॉलॉजीला नेक्स लेव्हला नेत आहेत. तर'' मेड ईन इंडिया व्हेंडिग मशीन! गोविंदजी यांचा महान अविष्कार आहे. आपल्या देशाला वेंडिग मशीन द्वारे बदलण्याची वेळ आहे'' अशी प्रतीक्रिया दुसऱ्या नेटकऱ्यांने दिली आहे.

सध्या तुम्हाला ही मशीन दिल्लीमध्ये दोन ठिकाणी पाहायला मिळेल. एक रोहिणी, सेक्टर आणि दुसरी दिल्ली टेक्नॉलॉजीकल युनीवसर्टिज दौलतपूर येथे आहे. येथे 20 रुपयांना पाणीपुरी आणि 21 रुपयांना विकत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com