काबुलमध्ये भारतीय दूतावासाजवळ रॉकेट हल्ला

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जानेवारी 2018

काबुल - अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये भारतीय दूतावासाला लक्ष्य केले गेले असून, येथे काल (सोमवार) रॉकेट हल्ला झाला. याबाबत रात्री उशीरा परराष्ट्र मंत्रालयानी माहिती दिली. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दूतावासाच्या इमारतीचे थोडे नुकसान झाले असले तरी, यामध्ये कोणतीही भारतीय व्यक्ती जखमी झालेली नाही.

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी देखील ट्विट करुन या हल्ल्यात जीवित हानी झाली नसल्याचे म्हटले आहे.

Web Title: Rocket lands inside the premises of Indian embassy in Kabul, all employees safe