रोहित शेखरच्या खूनप्रकरणी पत्नी अपूर्वाला अटक 

वृत्तसंस्था
बुधवार, 24 एप्रिल 2019

रोहित यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, शवविच्छेदन चाचणीमध्ये त्यांचा श्‍वास गुदमरून मृत्यू झाल्याचे उघड झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल झाला. संपत्तीच्या हव्यासापोटी हा खून झाल्याचा आरोप रोहित यांच्या मातु:श्री उज्ज्वला यांनी केला होता.

नवी दिल्ली : काँग्रेसचे दिवंगत नेते एन. डी. तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला; तसेच याप्रकरणी रोहित यांची पत्नी अपूर्वा आणि दोन घरगड्यांना अटक केली आहे.

रोहित यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, शवविच्छेदन चाचणीमध्ये त्यांचा श्‍वास गुदमरून मृत्यू झाल्याचे उघड झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल झाला. संपत्तीच्या हव्यासापोटी हा खून झाल्याचा आरोप रोहित यांच्या मातु:श्री उज्ज्वला यांनी केला होता.

त्यानंतर पोलिसांनी चौकशीनंतर त्याची पत्नी अपूर्वासह दोन घरगड्यांना अटक केली आहे. यांच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. रोहितचा 15 एप्रिलला मृतदेह घरात आढळला होता. 

Web Title: Rohit Shekhar murder case Wife Apurva shekhar of ND Tiwaris son arrested

टॅग्स