रोझ व्हॅली गैरव्यवहार- 1,250 कोटींची मालमत्ता जप्त

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : रोझ व्हॅली चिट फंड गैरव्यवहारप्रकरणी 1 हजार 250 कोटी रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली असून, यात आठ हॉटेल आणि रोल्स रॉईस मोटारीचा समावेश आहे. रोझ व्हॅली समूहाने चिट फंडच्या माध्यमातून पश्‍चिम बंगाल आणि ओडिशामधील हजारो नागरिकांची फसवणूक केली आहे.

रोझ व्हॅली समूहाच्या जयपूर, पोर्ट ब्लेअर, पणजी, हरिद्वार, रांची, सिलचर येथील प्रत्येकी एक आणि कोलकत्यातील दोन हॉटेलांवर सक्त वसुली संचालनालयाने जप्तीची कारवाई केली. यासोबत बारा मोटारी जप्त केल्या असून, यात पाच कोटी रुपयांच्या रोल्स रॉईस मोटारीचाही समावेश आहे. जप्त केलेल्या एकूण मालमत्तेची किंमत 465 कोटी असली तरी तिचे बाजारमूल्य 1 हजार 250 कोटी रुपये आहे. या प्रकरणी रोझ व्हॅली समूहाचे अध्यक्ष गौतम कुंडू याच्यासह अन्य काही जणांवर करचुकवेगिरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी कुंडू याला संचालनालयाने अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याआधी समूहाची 2 हजार 631 बॅंक खाती गोठविण्यात आली होती. या समूहाने 27 कंपन्या स्थापन करून त्याद्वारे चिट फंड सुरू केले होते.

Web Title: rose valley raid