कोण म्हणतं हे अच्छे दिन आहेत? रेल्वे भरतीच्या आंदोलनावरुन राहुल गांधी संतापले

RRB NTPC Protest : परीक्षेत गैरकारभार झाल्याचा आरोप करत हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
Rahul Gandhi - RRB NTPC
Rahul Gandhi - RRB NTPC Team eSakal

रेल्वे भरती परीक्षेत (RRB NTPC) घोटाळा झाल्याचा आरोप करत बिहारमध्ये (Bihar) परीक्षार्थींनी जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. रेल्वे विभागातील या भरतीमध्ये झालेल्या गलथान कारभारामुळे उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि विद्यार्थ्यांच्या अनेक जिल्हयांत विद्यार्थ्यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला समर्थन देत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) त्यांच्या दु:ख खरं असल्याचं म्हटलं आहे.

Rahul Gandhi - RRB NTPC
भाजप देशातील सर्वात श्रीमंत पक्ष; ADRच्या अहवालातून माहिती समोर
Rahul Gandhi - RRB NTPC
CM चन्नींचा भाऊ लढणार अपक्ष; उमेदवारी अर्ज दाखल

बिहार (Bihar) आणि उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) काही जिल्ह्यांत विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन (RRB NTPC Protest) सुरू केलं आहे. बेरोजगारीच्या विरोधात सुरु असलेल्या या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं होतं. त्यातच बिहारच्या गया शहरात आंदोलकांनी रेल्वेचे डबे पेटवून दिले. पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करण्यास सुरूवात केली असून, शेकडो लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज करत आम्हाला जाणीपुर्वक भडकवण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असून, त्यांचं दु:ख खरं आहे असं म्हणत कोण म्हणतंय हे अच्छे दिन आहेत? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

Rahul Gandhi - RRB NTPC
झोपडपट्टी ते मायक्रोसॉफ्ट! शाहीना अत्तरवाला यांची प्रेरणादायी कहाणी

हजारो रेल्वे परीक्षार्थी 24 जानेवारीला बिहारमधील पाटना येथे रेल्वे स्थानकावर जमले होते. त्यांनी पाच तासांहून अधिक काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत केली होती. तसेच त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा देखील आरोप आहे. या विद्यार्थ्यांना खान सर यांनी भडकविल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरण खान सरसह काही इतर कोचिंग सेंटर्स आणि 400 हून अधिक अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मंगळवारी संध्याकाळी राजेंद्र नगर रेल्वे टर्मिनल आणि भिकना पहाडी येथे हिंसाचार घडवून आणणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com