CAG Report 2023: 18 कोटी ऐवजी 250 कोटी उधळले! एक्सप्रेस वेच्या बांधकामात मोठा घोटाळा, कॅगनं केला खुलासा

Expressway Cost: मंजूर केलेल्या बांधकामाच्या खर्चात 14 पट वाढ केली आहे.
Dwarka Expressway
Dwarka ExpresswaySakal

Dwarka Expressway: दिल्ली ते गुरुग्रामला जोडणाऱ्या द्वारका एक्सप्रेस वेच्या बांधकामात मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाच्या (कॅग) अहवालातून हा खुलासा झाला आहे. कॅगच्या अहवालानुसार 29.06 किमी लांबीच्या द्वारका द्रुतगती मार्गाच्या बांधकामाचा खर्च जास्त करण्यात आला आहे.

कॅगने आपल्या अहवालात म्हटले आहे की द्वारका द्रुतगती मार्गाच्या बांधकामाला आर्थिक व्यवहारावरील कॅबिनेट समितीने (CCEA) 18.20 कोटी रुपये प्रति किलोमीटर दराने मंजुरी दिली होती.

परंतु रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) ) ने बांधकाम करणाऱ्या कंपनीला 250.77 कोटी रुपये प्रति किलोमीटर दराने खर्चाची रक्कम मंजूर केली. म्हणजेच CCEA ने मंजूर केलेल्या रकमेत 14 पट वाढ झाली आहे.

Dwarka Expressway
Tax on X Earnings: तुम्ही Twitter वरून पैसे कमवत आहात? तर भरावा लागेल 18% GST, काय आहे नियम?

दिल्ली ते गुरुग्रामला जोडण्यासाठी 14 लेनचा द्वारका एक्सप्रेस वे बांधण्यात आला आहे. या अंतर्गत दिल्ली आणि गुरुग्राम दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 48 (NH 48) च्या समांतर मार्ग विकसित करण्यात आला आहे. जेणेकरून राष्ट्रीय महामार्गावरील गर्दी कमी होईल.

अभ्यासानुसार, दिल्ली आणि गुरुग्राम दरम्यान NH-48 वर दररोज धावणाऱ्या सरासरी 3,11,041 गाड्यांपैकी 2,88,391 प्रवासी वाहने (92.72%) होती. यापैकी 2,32,959 ट्रेन या दोन्ही शहरांदरम्यान दररोज प्रवास करतात.

Dwarka Expressway
Adani Group: काऊंटडाऊन सुरू! अदानी समूहा संबंधीचा सेबीचा अहवाल पूर्ण, सुप्रीम कोर्टात कधी होणार सुनावणी?

यासोबतच कॅगने आपल्या अहवालात भारत माला प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या खर्चाच्या रकमेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com