RSS 100th Anniversary : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दहशतवादी संघटना, नेहरुंच्या कृपेने वाचली; कॉंग्रेस नेत्याचा हल्लाबोल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज १०० वा वर्धापनदिन आहे.अशातच कॉंग्रेस नेतेउदित राज यांनी आरएसएसवर निशाणा साधला आहे. ही दहशतवादी संघटना होती. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या उदारमतवादी भुमिकेमुळे ही संघटना वाचली असे ते म्हणाले.
RSS 100th Anniversary : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दहशतवादी संघटना, नेहरुंच्या कृपेने वाचली; कॉंग्रेस नेत्याचा हल्लाबोल
Updated on

Summary

  1. काँग्रेस नेते उदित राज यांनी आरएसएसला दहशतवादी संघटना म्हटले.

  2. त्यांच्या मते, आरएसएसने स्वातंत्र्यपूर्वी देशाचा विश्वासघात केला.

  3. उदित राज म्हणाले की, नेहरूंच्या उदारमतवादी भूमिकेमुळे संघ वाचला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज आपला १०० वा वर्धापन दिन साजरा करत आहे. १९२५ मध्ये विजयादशमीला स्थापन झालेल्या या संघटनेवर देशभक्ती, देशाच्या स्वातंत्र्यात योगदान आणि ब्रिटिशांना पाठिंबा देण्याचे आरोप वारंवार केले जात आहेत. भारतीय जनता पक्षाची मातृ संघटना असलेल्या आरएसएसवर एकेकाळी महात्मा गांधींची हत्या केल्याचा आरोप होता. ती देशातील सर्वात मोठी गैर-राजकीय संघटना राहिली आहे. मात्र आज एका काँग्रेस नेत्याने आरएसएसवर तीव्र हल्ला चढवला आहे.आरएसएस दहशतवादी संघटना असून आणि पंडित नेहरूंच्या कृपेने ही संघटना वाचली असे कॉंग्रेस नेते उदित राज यांनी म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com