संघ, भाजप राम मंदिर बांधण्यास कटिबद्ध, पण... : मोहन भागवत

RSS BJP is committed to building Ram Temple says Mohan Bhagwat
RSS BJP is committed to building Ram Temple says Mohan Bhagwat

हरिद्वार : ''देशातील बहुसंख्य समाज हा भगवान रामाची पूजा करत आहे. त्यामुळे विरोधीपक्षही अयोध्येतील राम मंदिराला उघडपणे विरोध करु शकत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी कटिबद्ध आहे. मात्र, काही बाबी पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो'', असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (मंगळवार) सांगितले.

पतंजली योगपीठ येथे आयोजित एका कार्यक्रमात भागवत बोलत होते. ते म्हणाले, ''संघ आणि भाजप अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी कटिबद्ध आहेत. विरोधकही राम मंदिराला विरोध करू शकत नाहीत. मात्र, त्यासाठी वेळ लागतो. प्रत्येक सरकारच्या काही मर्यादा असतात. त्या मर्यादांमध्ये राहूनच त्यांना काम करावे लागते. पण संत आणि पुरोहित यांना अशा कोणत्याही मर्यादा नसतात. राम मंदिराची उभारणी नक्की होईल. पण त्यासाठी काही अवधी लागेल''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com