RSSच्या शाखेत लैंगिक शोषण, माझं आयुष्य हाच पुरावा; २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरनं स्वत:ला संपवलं

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करत एका २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरनं त्याचं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.
Controversy Erupts After Engineer’s Death Linked to RSS Branch Incident

Controversy Erupts After Engineer’s Death Linked to RSS Branch Incident

Esakal

Updated on

केरळमध्ये २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरनं आत्महत्या केल्याची घटना घडलीय. कोट्टायम इथं राहणाऱ्या तरुणाचा मृतदेह तिरुवनंतपुरम इथल्या थंपानूरमध्ये एका लॉजवर आढळून आला. इन्स्टाग्रामवर तरुणाने मृत्यूआधी पोस्ट करत आरएसएसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. संघाच्या शाखेत लैंगिक शोषण झाल्याचा आरोप त्यानं केला होता.तरुणाचं नाव आनंदु अजी असं आहे. त्याच्या सुसाइड नोटमध्ये लिहिलं की, वडिलांनी लहानपणीच आरएसएसमध्ये टाकलं होतं. तिथं लैंगिक आणि शारीरिक शोषणाचा सामना करावा लागला. शेजारी एनएमकडून तीन वर्षे वय असल्यापासून छळ केला. आरएसएसच्या आयटीसी आणि ओटीसी कँपमध्येही असंच घडलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com