नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी पुन्हा एकदा बलशाली भारतासाठी हिंदू (Hindu) ऐक्याची हाक दिली आहे. एका बलशाली राष्ट्राला कुणीही पराभूत करू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले. सद्गुण आणि धार्मिकता यांच्या एकत्रिकरणातून शक्तीचा जन्म होतो. केवळ क्रूर ताकद ही दिशाहीन ठरू शकते. यातून केवळ हिंसाचाराचाच जन्म होतो, असेही त्यांनी सांगितले.