'आयोध्येनंतर आंदोलन करायचं नाही, पण ज्ञानवापीला...', भागवतांचं मोठं वक्तव्य

Mohan Bhagwat
Mohan BhagwatSakal

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षांनी केल्यानंतर आता राजकारण तापलं आहे. मशिदीच्या व्हिडिओग्राफीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता या संपूर्ण प्रकरणावर आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी वक्तव्य केलंय. भागवत यांनी या संपूर्ण प्रकरणावर परस्पर सामंजस्याने तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे. (RSS Chief Mohan Bhagwat on Dnyanvapi)

काही ठिकाणांबद्दल आम्हाला विशेष आदर आहे आणि आम्ही त्याबद्दल बोललो, असं भागवत म्हणाले. पण रोज नवीन प्रकरण आणू नये, असं त्यांनी म्हणत त्यांनी हिंदू पक्षकारांचे कान टोचले आहेत. आम्ही वाद का वाढवायचा? काही ठिकाणांबद्दल आम्हाला विशेष आदर आहे आणि आम्ही त्याबद्दल बोललो, पण रोज नवीन प्रकरण आणू नये, असे ते म्हणाले. पण प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधायचं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. (Mohan Bhagwat Latest News)

सध्या ज्ञानवापीचा मुद्दा सुरू आहे. हा एक इतिहास आहे, तो आपण बदलू शकत नाही. आम्हाला ते जमले नाही. देशातील खास ठिकाणं प्रतिकात्मक आहेत. पण रोज एक केस काढता कामा नये. आपण भांडणं वाढवू नये, असं भागवत यांनी म्हटलंय.

इस्लाम बाहेरून आला, आक्रमकांच्या माध्यमातून आला. ज्यांना भारताचे स्वातंत्र्य हवे होते त्यांचे मनोधैर्य खचण्यासाठी त्यावेळी देवस्थाने पाडण्यात आली, अशी महिती सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली.

महत्वाचे मुद्दे

  • ज्ञानवापीला स्वत:चा इतिहास आहे

  • इतिहास कुणीही बदलू शकत नाही

  • प्रत्येक मशिदीत शिवलिंग का पाहायचा?

  • हिंदू हा मुस्लिमांच्या विरोधात नाही

  • स्वातंत्र्य युद्धात हिंदुसोबत मुस्लीमही लढले

  • हिंदू-मुस्लिमांनी आपपासात भांडू नये

  • अयोध्येतील राम मंदिरानंतर आंदोलन करायचं नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com