

RSS Leader’s Son Shot Dead; Police Launch High-Level Prob
Esakal
पंजाबमध्ये आरएसएसच्या ज्येष्ठ नेत्याच्या मुलाची भरदिवसा हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय. शनिवारी दोन हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत गोळ्या झाडल्या. यात नवीन अरोरा यांचा मृत्यू झाला. नवीन अरोरा हे पंजाबमधील ज्येष्ठ आरएसएस नेते बलदेव राज अरोरा यांचे पुत्र होते. फिरोजपूर शहरात बँकेसमोरच त्यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा झाल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.