संघ लोकशाही विचार मानणारी संघटना : मोहन भागवत

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 जून 2018

सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी भागवत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाचा प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत समारोप होत आहे. तत्पूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी भागवत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.

मोहन भागवत यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :

- संघ लोकशाही विचार मानणारी संघटना.

- स्वातंत्र्य आंदोलनात हेडगेवार क्रांतीकारक होते.

- सर्व घटकांना एकत्रित आणणे हे संघाचे ध्येय. 

- देशातील चांगल्या लोकांना संघ नेहमी निमंत्रित करतो.

- विविधता असणे समृद्धीची बाब

-  आपण सर्व एक आहोत, असे वाटले पाहिजे.

-  सरकारे सगळी करू शकते.

- मनातील सर्व भेदभाव दूर करून राहिल्यास त्या अभियानाचे घटक बनेल तेव्हा देशाचे भले होते.

- मुखर्जी यांच्यासारख्या सज्जन व्यक्तीकडून आम्ही मार्गदर्शन घेणार आहोत. 

- समाजातील सर्व घटकाला जोडण्याचे काम संघ करतो.

- सर्वांना समजून जाण्याचे संघाचे काम

- समाज बदलत्या वातावरणानुसार चालतो.

- आदर्शाची कमी आपल्यामध्ये नाही.

- व्यवहाराबाबत आपण निकृष्ठ होतो. मात्र, आता ही स्थिती बदलत आहे.

-  दुसऱ्यांना त्रास देण्याचे शक्तीचा वापर केला जातो. 

- विद्येचा वापर समाजात ज्ञान वाढविण्यासाठी करावा.

- शक्तीला चारित्र्याचा आधार हवा.

Web Title: RSS Mohan Bhagwat says in RSS Program