मोदी सरकारचा धाडसी निर्णय; संघाकडूनही कौतुक!

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी ट्विट करत मोदी सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याची शिफारसीसह जम्मू काश्मीरची पूनर्रचना करण्याचा प्रस्ताव आज (सोमवार) गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मांडला. यामुळे मोदी-शहांवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही सरकारचे अभिनंदन केले आहे. 

संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी ट्विट करत मोदी सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. 'सरकारने उचललेल्या या धाडसी पावलाबद्दल त्यांचे अभिनंदन. देशासह जम्मू-काश्मीरच्या हिताच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय होता. सगळ्यांनी आपले राजकीय वाद बाजूला ठेवत या प्रस्तावाचे स्वागत करावे' असे या ट्विटमध्ये लिहिले आहे.

मोदी सरकारच्या या धाडसी पावलाचं देशभरातून कौतुक होतंय आणि स्वागतंही केलं जातंय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSS praises Modi sarkar for decision Jammu Kashmir decision