
नवी दिल्ली : भारतातील समाजिक आरक्षणाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे यांनी महत्वाचं विधान केलं आहे. RSS आरक्षणाचा खंदा समर्थक असून जोपर्यंत देशात विषमता अस्तित्वात असेल तोपर्यंत आरक्षणाची व्यवस्था कायम रहावी, असं त्यांनी म्हटलं आहे. दिल्लीत इंडिया फाउंडेशनतर्फे आयोजित 'आधुनिक दलित इतिहासाचे जनक' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात मंगळवारी ते बोलत होते. टाइम्सनाऊ न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे.
होसबाळे म्हणाले, "दलितांच्या इतिहासाशिवाय भारताचा इतिहास अपूर्ण आहे. ते कायमच सामाजिक सुधारणांसाठी आघाडीवर राहिले आहेत. मी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरक्षणाचे कायमच खंदे समर्थक राहिलो आहोत. आमच्यासाठी सामाजिक सौहार्द आणि सामाजिक न्याय या राजकीय नीती नाहीत. या दोन्ही गोष्टींवर आमचा विश्वास आहे."
"आरक्षण ही भारतासाठी ऐतिहासिक गरज आहे. जोपर्यंत विशिष्ट समाजाला विषमता अजूनही कायम असल्याचं वाटेल तोपर्यंत आरक्षण कायम राहिलं पाहीजे. आरक्षण हे सकारात्मक कृत्यांसाठीच हत्यार आहे. समाजातील सर्व घटकांमधील सलोखा आणि आरक्षण या बाबी हातात हात घालून जात असतात. त्यामुळे ज्या महान व्यक्तींनी समाज सुधारणेसाठी कार्य केलं, त्यांना दलित नेते म्हणून संबोधनं चुकीचं ठरेल कारण ते संपूर्ण समाजाचे नेते आहेत," असंही होसबाळे यावेळी म्हणाले.
"जेव्हा आपण समाजातील 'एससी' आणि 'एसटी' प्रवर्गातील विविध पैलूंबाबत बोलतो तेव्हा आरक्षणाचा मुद्दा प्रकर्षानं समोर येतो. मी आणि माझ्या संघटनेने अनेक दशकांपासून आरक्षणाला मोठा पाठिंबा दिला आहे. ज्यावेळी विविध शैक्षणिक संस्थांच्या कॅम्पसमध्ये आरक्षणविरोधी निदर्शने होत होती तेव्हा आम्ही आरक्षणाच्या समर्थनाचा ठराव केला होता. तसेच पाटण्यात याबाबत चर्चासत्रेही घेतली होती," असंही दत्तात्रय होसबाळे यांनी म्हटलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.