RSS कार्यकर्त्यासह त्याच्या गरोदर पत्नी, मुलाची हत्या

वृत्तसंस्था
Thursday, 10 October 2019

- अज्ञातांनी केली हत्या. 

- आरएसएस कार्यकर्ता, गरोदर पत्नी आणि मुलाचीही हत्या.

मुर्शिदाबाद​ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते प्रकाश पाल यांची काही अज्ञातांनी हत्या केली. प्रकाश यांच्यासह त्यांची पत्नी ब्युटी पाल आणि त्यांचा सहा वर्षीय मुलगा अंगण पाल याचीही हत्या करण्यात आली. ब्युटी पाल या आठ महिन्यांच्या गरोदर होत्या. ही घटना पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथे घडली.

प्रकाश, ब्युटी पाल यांच्यासह त्यांच्या मुलाला हल्लेखोरांनी भोकसून हत्या केली. तसेच अंगण पाल या बालकाचा गळाही दाबण्यात आला. यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितले, की प्रकाश पाल हे मंगळवारी सकाळी 11 वाजता दिसले. त्यावेळी ते बाजारातून घरी येत होते. मात्र, तासाभरातच या कुटुंबातील तिघांचीही हत्या झाल्याचे समजले. 

मुर्शिदाबादचे (दक्षिण) भाजप उपाध्यक्ष हुमायून कबीर यांनी सांगितले, की पाल हे आरएसएस सदस्य होते. मात्र, त्यांच्या हत्येशी कोणताही राजकीय संबंध नाही. प्रकाश आणि अंगण पाल या दोघांचे मृतदेह कनाईगंज-लेबुताला येथील त्यांच्या निवासस्थानी आढळले आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी भाजपला दणका

व्यवसायाने होते शिक्षक

प्रकाश पाल आरएसएसचे कार्यकर्ते होते. मात्र, ते व्यवसायाने शिक्षकही होते. मंगळवारी त्यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे.

Vidhan Sabha 2019 : ‘आमचं ठरलंय, आता दक्षिण उरलंय’

ट्विटरवर #Murshidabad ट्रेंड 

दरम्यान, हा घटनेचे वृत्त समोर आल्यानंतर नेटीझन्सकडून याचा निषेध आणि संताप व्यक्त केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर ट्विटरवर सध्या #Murshidabad हा ट्रेंड सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSS worker pregnant wife 6 year old son killed in Bengals Murshidabad