ऑनलाईन क्लासमध्ये मुलीला डान्स करायला सांगितलं, शिक्षक पोक्सो अंतर्गत अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

online Class

ऑनलाईन क्लासमध्ये मुलीला डान्स करायला सांगितलं; शिक्षक अटकेत

तामिळनाडू मधील इरोड जिल्ह्यात एका खाजगी शाळेतील शिक्षकाला स्थानिक पोलिसांनी POCSO (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स) कायदा, 2012 अंतर्गत अटक केली आहे. यानंतर आज सोमवारी विद्यार्थी आणि पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकाच्या अटकेची मागणी करत आंदोलन केले.

घटनेबद्दल सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपुर्वी शिक्षकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती, एका खाजगी शाळेतील 12वीच्या विद्यार्थ्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या शाळेतील जीवशास्त्राच्या शिक्षकाला अटक केली. शिक्षकाने ऑनलाइन क्लासदरम्यान विद्यार्थिनींवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. रिपोर्टनुसार शिक्षकाने तीन विद्यार्थिनींना स्पर्श करत तसेच अश्लिल भाषा वापरुन आणि ऑनलाइन क्लासमध्ये विद्यार्थिनींना डांस करण्यास भाग पाडत लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत.

दरम्यान 49 वर्षीय आरोपी इरोडच्या चिनापुरम येथील एका खासगी शाळेत शिक्षक आहे. त्यावर जिल्हा बाल संरक्षण युनिटच्या तक्रारीच्या आधारे, पोलिस कर्मचार्‍यांनी शिक्षिकाला POCSO कायद्या अंतर्गत अटक केली. या घटनेनंतर व सोमवारी, विद्यार्थी आणि पालकांनी त्यांच्या शाळेजवळील रस्त्यावर मुख्यध्यापकावर कारवाईसाठी धरणे दिले. पोलिसांनी शिक्षकास अटक केली असून त्याला पोलिस कोठडीत पाठवण्यात आले असून चौकशी नंतर अधिक माहिती समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: 73 वर्षांनी भेटले दोन जुने मित्र; भारत-पाक फाळणीत झाले होते वेगळे

तमिळनाडूमध्ये नोव्हेंबर महिन्यात घडलेली अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे. करूर जिल्ह्यातील एका खाजगी शाळेतील 12 वीच्या विद्यार्थिनीने 19 नोव्हेंबर रोजी लैंगिक छळामुळे आपले जीवन संपवत असल्याची चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. 17 वर्षीय मुलीने घरात गळफास लावून घेतला होता, तीने कोणत्याही गुन्हेगाराचे नाव घेतले नव्हते दरम्यान पोलिस या प्रकरणात चिठ्ठीतील हस्तलिखिताची तपासणी करत आहेत.

तर कोईम्बतूर जिल्ह्यात 13 नोव्हेंबर रोजी एका शाळेच्या मुख्याध्यापकावर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि नंतर या 12 वीच्या विद्यार्थिनीने तिच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणात शिक्षकाने तिच्यावर लैंगिक आत्याचार केल्याच्या मुलीच्या तक्रारीवर कारवाई न केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुलीने आत्महत्या केली.

हेही वाचा: मतदार ओळखपत्रात घरबसल्या अपडेट करा नवीन पत्ता, वाचा सोपी प्रोसेस

loading image
go to top