
रशियाच्या पूर्वेकडील भागात बुधवारी सकाळी एक अतिशय शक्तिशाली आणि भयानक भूकंप झाला. त्याची तीव्रता८.८ रिश्टर स्केल इतकी होती., जी कोणत्याही भूकंपासाठी खूप जास्त मानली जाते. हा भूकंप समुद्राच्या आत झाला आणि त्याचा परिणाम इतका तीव्र होता की रशियाजवळील किनारपट्टी भागात त्सुनामीच्या लाटा उठू लागल्या. त्यानंतर, अलास्का, हवाई, न्यूझीलंड सारख्या अनेक देशांमध्ये त्वरित त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान भारतातील लोकांच्या मनातही प्रश्न निर्माण होऊ लागला की त्याचा आपल्या देशावरही परिणाम होईल का? परंतु या भूकंपाचा भारत आणि हिंद महासागराला कोणताही धोका नसल्याचे इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ने (INCOIS) स्पष्ट केले केले आहे.