युक्रेनमध्ये NOTAM जारी; भारतीयांना आणायला गेलेलं विमान अर्ध्यातूनच परतलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Air India

गुरुवारी सकाळी युक्रेनमधील सर्व नागरी विमान उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे.

युक्रेनमध्ये NOTAM जारी; भारतीयांना आणायला गेलेलं विमान अर्ध्यातूनच परतलं

नवी दिल्ली - रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. यावेळी विमानतळ आणि लष्करी ठिकाणांना टार्गेट कऱण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव युक्रेननं (Ukraine) त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. परिणामी भारतीयांना (India) आणण्यासाठी गेलेलं विमान परत येत आहे. एअर इंडियाच्या (Air India) विमानाने युक्रेनची राजधानी किवला जाण्यासाठी उड्डाण केलं मात्र आता ते दिल्लीला परत येत आहे. याबाबत एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी माहिती देताना म्हटलं की, एअर इंडियाचं AI 1947 विमान परत येत आहे. कारण किवमध्ये NOTAM जारी करण्यात आले आहे.

युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी एअरमनना नोटीस जारी केली आहे. यानुसार गुरुवारी सकाळी युक्रेनमधील सर्व नागरी विमान उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. एअर इंडिया आणि केंद्र सरकारने या नोटिसीनंतर विमान दिल्लीला परत बोलावण्याचा निर्णय घेतला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दिल्लीला परतण्यासाठी विमानाने इराणच्या हवाई क्षेत्रात युटर्न घेतला.

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास युक्रेनसाठी विमान उड्डाण सुरु झाले. दरम्यान, किवमधून युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्सचे विमान सकाळी ७.४५ वाजता दिल्लीच्या विमानतळावर उतरले. STIC समुहाचे संचालक अंजू वारिया यांनी सांगितलं की,' विामनात १८२ नागरिक होते आणि त्यात बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश होता. आणखी काही विमाने भारतीयांना आणण्यासाठी जातील.'

रशियाकडून सुरु असलेल्या लष्करी हालचालींमुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच रशियाने युक्रेनच्या एअरबेसवरसुद्धा हल्ला केल्याचं वृत्त एएफपी वृत्तसंस्थेनं दिलं आहे. तर दुसऱ्या बाजुला युक्रेनने असा दावा केला आहे की, त्यांनी रशियाच्या पाच विमानांना आणि हेलिकॉप्टरला लुहान्स्क प्रांतात पाडलं. यामुळे दोन्ही देशात युद्धाची ठिणगी पडली आहे.

Web Title: Russia Ukraine Crisis Indian Flight Return After Notam In Kyiv

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top