
भारतीय उपखंडात डॉलरची श्रीमंती वाढली
नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्ध, चीनमधील कोरोनाचे वाढते संकट आणि कच्च्या तेलाचे वाढत्या भावामुळे विशेषत: भारतीय उपखंडात महागाईने कळस गाठला आहे. डॉलर महाग होत असल्याने आयातखर्च वाढत चालला आहे. भारतात रुपयाची विक्रमी घसरण झाली असून आज एका डॉलरमागे ७७.२७ रुपये मोजावे लागले. पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, नेपाळची आर्थिक स्थितीही बिकट झाली असून नागरिकांना डॉलरसाठी जादा पैसे मोजावे लागत आहे.
पाकिस्तान: पाकिस्तानात रुपयाची किंमत आतापर्यंत सर्वात नीचांकी पातळीवर पोचली आहे. पाकिस्तानात महागाई वाढण्यामागे आणि डॉलर महाग होण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. अन्य देशांतून आथिॅक मदत बंद होणे, परकी चलनाचा साठा कमी होणे, व्यापारातील तूट ही प्रमुख कारणे सांगितली जात आहे.
नेपाळ: नेपाळचा परकी चलन साठा देखील कमी होत चालला आहे. परिस्थिती अशीच राहिली तर आयात करण्यासाठी आर्थिक बळ नेपाळकडे राहणार नाही. नेपाळच्या बाजारात असलेल्या ८० ते ९० टक्के वस्तू या आयात केलेल्या आहेत.
म्यानमार: म्यानमारवर सध्या १० ते ११ अब्ज डॉलरचे कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी म्यानमारकडे निम्मे पैसे देखील नाहीत. परकी चलन साठ्यात घट झाली आहे. अशा स्थितीत म्यानमारच्या सेंट्रल बँकेने नागरिकांना उत्पन्नापोटी मिळणाऱ्या परकी चलनाला स्थानिक चलनात बदल करून घेण्याचे निर्देश दिले.
श्रीलंका: श्रीलंकेकडे सध्या केवळ ५० अब्ज डॉलर परकी चलनाचा साठा आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदतीचा ओघ असला तरी कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे.
Web Title: Russia Ukraine War Crude Oil Prices Hike Inflation Myanmar Sri Lanka
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..