युक्रेनमध्ये अडकले भारतीय; PM मोदींनी पुन्हा बोलावली उच्चस्तरीय बैठक| Russia Ukraine Crisis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून त्यांना मायदेशी आणण्यासाठी भारताने मिशन गंगा सुरु केलं आहे.

युक्रेनमध्ये अडकले भारतीय; PM मोदींनी पुन्हा बोलावली उच्चस्तरीय बैठक

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धस्थिती गंभीर बनली आहे. यामुळे अनेक देशांमधील नागरिक युक्रेनमध्ये भीतीच्या छायेखाली आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून त्यांना मायदेशी आणण्यासाठी भारताने मिशन गंगा सुरु केलं आहे. दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने विद्यार्थ्यांनी थेट युक्रेनच्या सीमेवर न जाता सीमेजवळ असलेल्या शहरात आश्रय घ्यावा आणि मदतीसाठी भारतीय अधिकारी, पथके यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा उच्च स्तरीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक सुरु झाली आहे.

‘ऑपरेशन’गंगा अंतर्गत १ हजार ३९६ नागरिक आणि विद्यार्थ्यांना परत आणले आहेत. त्याचप्रमाणे, युक्रेनच्या राजदूतांच्या मागणीनुसार भारतातर्फे युक्रेनला औषधे, वैद्यकीय उपकरणांसह मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्व मदत केली जात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या ‘ऑपरेशन गंगा’बाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी माहिती दिली आहे.

हेही वाचा: Ukraine Russia War LIVE : खार्किवमध्ये रशियाचा गोळीबार; ११ नागरिकांचा मृत्यू

युक्रेनमधील भारतीय वकिलातीतर्फे नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राजधानी किव्ह आणि खार्किव्ह येथील घडामोडींवर बारकाईने लक्ष असून किव्ह येथील आठवड्याच्या शेवटी असलेली संचारबंदी मागे घेण्यात आली आहे. तसंच विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी रेल्वेने पश्चिम युक्रेनमध्ये जावे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बागची यांनी सांगितले आहे.

Web Title: Russia Ukraine War Indian Student Stuck Pm Modi High Level Meeting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..