
कर्नाटकात गोकर्णमध्ये एका गुहेत रशियन महिला तिच्या दोन चिमुकल्या मुलींसोबत राहत होती. पोलिसांना महिला गुहेत राहत असल्याचं समजताच त्या भागात भूस्खलनाचा धोका असल्यानं तिला ताब्यात घेण्यात आलं. तिची चौकशी केली असता तिचा व्हिसा संपल्याचं आढळून आलं. आता तिला रशियाला पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महिला तिच्या ६ आणि ४ वर्षांच्या मुलींसोबत राहत होती. जवळच्या लोकांना गमावलं, याशिवाय इतर अनेक कारणं होती ज्यामुळे रशियाला परतता आलं नाही असं तिने सांगितलंय.