
कर्नाटकातील गोकर्णमध्ये जंगलातील गुहेत एक रशियन महिला तिच्या दोन चिमुकल्या मुलींसह राहत होती. गस्त घालणाऱ्या पोलिसांना महिला मुलींसह आढळल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आलं. रशियन महिलेचं नाव निना कुटिना असं असून २०१७ मध्ये व्हिसाची मुदत संपल्यापासून ती भारतात अनेक ठिकाणी जंगलांमध्ये राहतेय. या काळातच तिनं दोन मुलींना जन्म दिला. आता पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिला रशियाला पाठवण्याची तयारी सुरू करण्यात आलीय.