
Russian Woman India: कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात गोकर्णजवळ रामतीर्थ इथल्या गुहेत एक रशियन महिला तिच्या दोन लहान मुलींसह राहत असल्याचं आढळून आलं. ४० वर्षीय नीना कुटिना हिला मोही नावानेही ओळखलं जातं. तिच्या दोन मुली ६ वर्षीय प्रेया आणि ४ वर्षीय अमा यांच्यासोबत गुहेत राहत होती. तीन गुहांमध्ये गेल्या २ महिन्यांपासून त्या लपून बसल्या होत्या.