
Russian Woman and Her Partner Relationship: दोन चिमुकल्या मुलींसह कर्नाटकातील गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. तिच्या मुलींचा जन्म जंगलातच झाला. तर मुलींचा बाप एक इस्रायलचा व्यावसायिक असल्याचं समोर आलंय. आता इस्रायली नागरिक असलेल्या व्यावसायिकाने दोघांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलंय. तसंच मुलींच्या कस्टडीसाठी कोर्टाचं दारही ठोठावलंय. दरम्यान, जंगलातील आपल्या राहणीमानाबाबत चुकीचं पसरवलं जात असल्याचं रशियन महिला नीना कुटिना हिने म्हटलंय.