

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि त्यांच्या पत्नी क्योको एस. जयशंकर यांना निवडणूक आयोगाच्या 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यासोबत सीबीआयचे संचालक प्रवीण सूद, त्यांची पत्नी वनिता सूद आणि आई कमलेश सूद, तसेच लष्कराचे माजी प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि त्यांच्या पत्नी सुनीता द्विवेदी यांच्याही नावांचा 'अनमॅप्ड लिस्ट'मध्ये समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई आणि त्यांच्या कुटुंबीयांचाही या यादीत समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.