प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन

वृत्तसंस्था
Friday, 25 September 2020

प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम (वय 74) यांचे आज (शुक्रवार) निधन झाले आहे. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी करोनावर मात केली होती. मात्र, त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

चेन्नईः प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम (वय 74) यांचे आज (शुक्रवार) निधन झाले आहे. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी करोनावर मात केली होती. मात्र, त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

माझ्या मृत्यूला देवच जबाबदार...

बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे बॉलिवडूवर शोककळा पसरली असून, अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बालसुब्रमण्यम यांना आवाजाचा जादूगार म्हटले जाते. त्यांनी जवळपास ४० हजार गाण्यांना आपला आवाज दिला आहे. अभिनेता सलमान खानसाठी 'तुमसे मिलने की तमन्ना है', 'पहला पहला प्यार है', 'दिल दीवाना' आणि 'साथिया तू ने ये क्या किया' यांसारखी अनेक गाणी गायली होती.

खासगी लॅबमध्ये 30 जण पॉझिटिव्ह; सरकारीमध्ये निगेटिव्ह

दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी करोनाची लागण झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले होते की, 'गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत बरी नाही. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी करोना चाचणी करून घेतली. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: s p balasubrahmanyam passed away due to corona virus