esakal | तोंडावर मास्क, कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच शबरीमला मंदिरात प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

sabrimala.jpg

दर्शनाला जाण्यासाठी तंदुरुस्ती प्रमाणपत्र घेऊन जाणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर मंदिरात केवळ 10 ते 60 वर्ष वयाच्या भाविकांनाच प्रवेश मिळेल.

तोंडावर मास्क, कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच शबरीमला मंदिरात प्रवेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तिरुवनंतपूरम- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सुमारे सात महिन्यांपासून बंद असलेले केरळमधील शबरीमला मंदिर भाविकांसाठी शनिवारी खुले करण्यात आले आहे.  मास्क घालून आणि कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल दाखवत काही भाविकांनी दर्शनही घेतले. कोरोना विषाणूविषयक मार्गदर्शिकेचे पालन करत पाच दिवस चालणाऱ्या मासिक पुजेसाठी मंदिर उघडण्यात आले आहे. सामान्य नागरिकांना आज सकाळी मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील मोठी धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. आता अनलॉकमध्ये हळूहळू धार्मिक स्थळे उघडली जात आहेत. 

शनिवारी शबरीमला मंदिरात दर्शनासाठी डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून 246 भाविकांनी बुकिंग केले आहे. दररोज केवळ 250 भाविकांना मंदिरात जाण्याची परवानगी असेल. केरळमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे अयप्पा मंदिरासाठी कडक प्रोटोकॉल लागू करण्यात आले आहेत. जे भाविक कोरोना रिपोर्ट घेऊन येत नाहीत. त्यांची निलक्कल बेस कॅम्प येथे अँटीजन टेस्ट घेतली जात आहे. कोरोना प्रोटोकॉलच्या पार्श्वभूमीवर तुपाचा अभिषेक आणि अन्नदानमची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 

हेही वाचा- Bihar Election : 'प्रण हमारा संकल्प बदलाव का'; तेजस्वी यादवांनी तरुणांना दाखवली मोठी स्वप्ने

इतर तरतुदीनुसार, दर्शनाला जाण्यासाठी तंदुरुस्ती प्रमाणपत्र घेऊन जाणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर मंदिरात केवळ 10 ते 60 वर्ष वयाच्या भाविकांनाच प्रवेश मिळेल. पम्बा नदीमध्ये स्नान आणि मंदिर परिसरात रात्री मुक्काम करण्यास मनाई आहे. 

हेही वाचा- दुकान बंद करुन घरी जात असलेल्या भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या

देशात मार्च महिन्याच्या अखेरीस लॉकडाऊन सुरु झाल्यानंतरच प्रथमच मंदिरात भाविकांना प्रवेश देण्यात आला आहे. मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या त्रावणकोर देवस्वोम बोर्डमधील (टीटीबी) सूत्रांनी मंदिर पहाटे 5 वाजता सुर होणार असल्याचे सांगितले.