esakal | सचिन पायलट यांच्या घरवापसीची चर्चा; काँग्रेसने ठेवल्या अटी
sakal

बोलून बातमी शोधा

sachin pilot comeback congress conditions randeep surjewala

सचिन पायलट यांनी आपण, भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. आता त्यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली आहे.

सचिन पायलट यांच्या घरवापसीची चर्चा; काँग्रेसने ठेवल्या अटी

sakal_logo
By
रविराज गायकवाड

नवी दिल्ली : काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले बंडखोर नेते सचिन पायलट यांच्या घरवापसीची सध्या चर्चा सुरू झाली आहे. सचिन पायलट यांनी कथित 30 आमदारांसह बंड पुकारलं होतं. पण, त्यांना राजस्थानातील गेहलोत सरकारला धक्का देण्यात अपयश आलं. काँग्रेस पक्षानं त्यांच्यावर कारवाई केली. आता पायलट यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली आहे.

देशभरातील बातम्यांसाठी येथे क्लिक करा

भाजपमध्ये प्रवेश नाहीच
काँग्रेसमधील तरुण चेहरा म्हणून, ज्यांच्याकडं विश्वासानं पाहिलं जात होतं. त्या सचिन पायलट यांच्या बंडखोरीनं सगळ्यांनाच धक्का बसला होता. पायलट यांच्या बंडखोरीमुळं गेहलोत सरकार अडचणीत येण्याचा धोका होता. परंतु, काँग्रेसने पायलट यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांना निलंबित केल्यामुळं, पायलट यांचं बंड पेल्यातील वादळ ठरलं. काँग्रेसनं त्यांची उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली. त्यावेळी पायलट यांनी आपण, भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. आता त्यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली आहे.

आणखी वाचा - उमर अब्दुल्ला म्हणतात, 'त्यांच्याविषयी वाईट वाटतं'

काँग्रेसचं म्हणणं काय?
काँग्रेसकडून या संदर्भात राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुरजेवाला म्हणाले, 'सचिन पायलट यांना आपली स्थिती सांगावी लागेल. त्यांनी चर्चेसाठी यावं. चर्चा झाली तरच त्यांच्या घरपावसीची शक्यता आहे.' गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पायलट यांच्या विरोधात कठोर शब्द वापरले आहेत. त्यांना पायलट यांची घरवापसी मान्य होईल का? या प्रश्नावर, सुरजेवाला म्हणाले, 'भाजपने फूस लावल्यानं गेहलोत यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दरम्यान, गेहलोत दुखवले होते. या काळात त्यांच्याकडून करण्यात आलेल्या विधानांना आता पूर्णविराम द्यायला हवा.' पायलट आणि त्यांच्या गटातील बंडखोर नेत्यांनी हायकमांडची माफी मागावी, ही प्रमुख अट सुरजेवाला यांनी पायलट यांच्यापुढे ठेवली आहे. बंडखोरांनी पक्षाची माफी मागितली तर, गेहलोत यांना काही अडचण नाही, असंही सुरजेवाला यांनी स्पष्ट केलंय.