राजस्थानमधील टोंकमध्ये सचिनच 'पायलट'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

राजस्थान विधानसभा निवडणुकीत टोंक मतदारसंघातील काँग्रेसचे सचिन पायलट हेच पायलटच्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सचिन पायलट यांना काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. 

टोंक (राजस्थान) : राजस्थान विधानसभा निवडणुकीत टोंक मतदारसंघातील काँग्रेसचे सचिन पायलट हेच पायलटच्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सचिन पायलट यांना काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. 

टोंकमधील राजघराणाने पायलट यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्याचाच फायदा त्यांना होताना दिसत आहे. सचिन पायलट यांना मतदान करण्याचे आवाहन टोंकचे पूर्वीचे नवीब अफताब अली खान यांनी त्यांच्या घराण्यातील सदस्यांना केले होते. नवाब घराणे राजकारणात सक्रिय नसले तरी टोंकवर त्यांचा मोठा प्रभाव आहे. पायलट यांच्याविरोधात राज्याचे वाहतूकमंत्री युनूस खान उभे होते. या निवडणुकीत भाजपचे ते एकमेव मुस्लिम उमेदवार होते.

टोंक मतदारसंघातील प्रचार विशेष चर्चेचा विषय ठरला होता. येथे भाजपचा प्रचार करणाऱ्या युनूस खान यांनी प्रचाराची अनोखी पद्धत अवलंबिली होती. मी सेवक आहे पायलट नाही असा दावा करत ते प्रचार करताना दिसत होते. खान हे वसुंधराराजे यांच्या सरकारमध्ये वाहतूक आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहे. कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा टोंक हा मतदारसंघ मुस्लिमबहुल असल्याने भाजपने खान यांना येथून उमेदवारी दिली आहे. पण, काँग्रेसनेच यश मिळविले आहे.

Web Title: Sachin Pilot is leading face of congress in Tonk from Rajasthan