esakal | राजस्थानमध्ये सत्ताबदल होणार? 'या' आहेत तीन शक्यता

बोलून बातमी शोधा

Sachin Pilot,  Congress, Ashok Gehlot, BJP

काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने दिला तर सचिन पायलट यांना गोटात थांबवण्यात काँग्रेसला यश मिळू शकते. पण...

राजस्थानमध्ये सत्ताबदल होणार? 'या' आहेत तीन शक्यता
sakal_logo
By
सुशांत जाधव

जयपूर : राजस्थानात काँग्रेसवर संकट घोंगावत आहे.  राज्याचे मुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड करण्याच्या तयारीत आहेत. पायलट गटाने 30 आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावाही केला आहे. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर  काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये रात्री उशीराने  बैठक पार पडली. आमदारांच्या बैठकीपूर्वी व्हिप जारी करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. 200 जागा असलेल्या राजस्थान विधानसभेत बहुमतासाठी 101 संख्याबळ असणे आवश्यक आहे. अशोक गहलोत 125 आमदारांच्या समर्थनावर सरकार चालवत आहेत. यात काँग्रेस 107, सीपीआयएम दोन, भारतीय ट्रायबल पार्टी दोन राष्ट्रीय लोक दल के एक आणि 13 अपक्ष आमदारांचा समावेश आहे. राजस्थानमध्ये भाजपचे 72 आमदार आहेत. 

सचिन पायलट यांना स्वंतत्र निर्णय अन् अधिकार बहाल केले तर... 

राजस्थानमधील सध्याच्या परिस्थितीत  केंद्रीय नेतृत्वाने पुढाकार घेऊन योग्य भूमिका घेणे महत्त्वपूर्ण आहे. सचिन पायलट यांना स्वतंत्र पद्धतीने काम करण्याची मोकळीक देणारा संदेश काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने दिला तर सचिन पायलट यांना गोटात थांबवण्यात काँग्रेसला यश मिळू शकते. काँग्रेसचे वरिष्ठ नेता कपिल सिब्बल यांनी ट्विटच्या माध्यमातून पक्षातील अंतर्गत वादासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. राजकीय विश्लेषकांच्या मते काँग्रेसने सचिन पायलट यांना त्यांच्याकडे असणाऱ्या मंत्रालयातील नियुक्त्यासह पक्षाच्या काही महत्त्वाच्या पदासंदर्भात युवा सहकाऱ्यांना संधी देण्याची सूट देण्याची आवश्यकता आहे. मागील काही महिन्यांपासून गहलोत यांच्या जवळचे नेते पायलट यांना हटवण्याच्या गोष्टीवर जोर देत आहेत. सचिन पायलट यांच्या संपर्कात असून त्यांच्यासोबत चर्चा सुरु असल्याचे काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांकडून सांगण्यात येत असले तरी गोष्ट चर्चेच्या पलीकडे गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 
 

 काँग्रेसची मध्यरात्री अडीच वाजता पत्रकार परिषद; केला 'हा' मोठा दावा

भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेणार?

काँग्रेसच्या पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्यानंतर काँग्रेस सरकारमधील अन्य काही नाराज आमदारांचा पायलट गटाला पाठिंबा असल्याचीही चर्चा आहे. या सर्वांसह पायलट भाजपमध्ये प्रवेश करु शकतात. असे झाले तर राजस्थानमधील काँग्रेस सरकार अल्पमतात येईल. भाजपा मध्य प्रदेशप्रमाणेच याठिकाणीही सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचीही राजकीय चर्चा रंगत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सचिन पायलट तिसरी आघाडी 

काँग्रेस पक्षाला सचिन पायलट यांच्यासोबत चर्चेतून मार्ग काढण्यास अपयश आले तर पाठिंबा असलेल्या आमदारांसोबत सचिन पायलट एक वेगळी आघाडी स्थापन करु शकतात. जर गहलोत अपक्ष आणि इतर पक्षांच्या साथीने बहुमत सिद्ध करु शकले तर राजस्थानमधील काँग्रेस सरकार तरु शकते. यापरिस्थितीत सरकारला अधिक धोकाही असेल. दुसरीकडे भाजपच्या समर्थनाने सचिन पायलट सरकार स्थापन करण्याचा डाव ही खेळू शकतील पण त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा दावा करण्या इतके संख्याबळ नसेल.