Sachin Raghuvanshi Wife Claim : मेघालयात मधुचंद्राच्या रात्री हत्या झालेल्या राजा रघुवंशीच्या कुटुंबावर नवं संकट कोसळलं आहे. राजाचा मोठा भाऊ सचिन रघुवंशी याच्यावर एका महिलेनं धक्कादायक आरोप केला आहे. महिलेचा दावा आहे, की तिनं सचिनशी मंदिरात लग्न केलं होतं आणि तिच्या पोटी जन्मलेलं मूल हे त्याचंच असल्याचं सिद्ध करणारा डीएनए रिपोर्ट (DNA Report) तिच्याकडं आहे.