जोशी हत्या प्रकरणातून साध्वी प्रज्ञाची निर्दोष मुक्तता

वृत्तसंस्था
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

देवास - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील जोशी हत्याप्रकरणातून देवास येथील न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

देवास - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील जोशी हत्याप्रकरणातून देवास येथील न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

साध्वी प्रज्ञा ठाकूर, वासुदेव परमार आणि आनंद राज कटारिया यांच्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेंद्र कुमार वर्मा यांनी कलम 120 (बी) (गुन्ह्याचा कट) अन्वये २०१५ साली  दोषी ठरविले होते. देवास येथील न्यायालयाने आज सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. साध्वी प्रज्ञा सध्या भोपाळ येथील मध्यवर्ती तुरुंगात आहेत. प्रकृती अस्वाथ्यामुळे त्या सध्या पंडित खुशीलाल आयुर्वेद रुग्णालयात उपचार घेत आहेत. मालेगाव येथे 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातून केंद्रीय अन्वेषण विभागाने साध्वी प्रज्ञा यांची अलिकडेच निर्दोष मुक्तता केली आहे.

सुनील जोशी यांची 29 डिसेंबर 2007 साली मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी देवास येथील चुना खादन येथे हत्या केली होती. या हत्या प्रकरणाचा तपास 2011 साली केंद्रीय अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला होता.

Web Title: Sadhvi Pragya Singh, 7 others acquitted in RSS 'pracharak’ Sunil Joshi murder case