
प्रज्ञा सिंह ठाकूर यांना कोरोना; काँग्रेस म्हणते ‘तुम्ही तो उपाय केला नाही का?’
मध्य प्रदेश : भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली. सोबतच त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. याचवेळी त्यांची खरडपट्टी काढायला काँग्रेस चुकली नाही. मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी ट्विट करून विचारले की, ‘त्यांनी स्वतः सांगितलेले उपाय करून पाहिले नाहीत का?’
मध्य प्रदेशातील भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) यांनी ट्विट करून स्वतःला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, आज माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. दोन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी सतर्क राहावे आणि गरज पडल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी ट्विटद्वारे केली आहे.
मागच्या वर्षी साध्वी प्रज्ञा ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) यांनी गोमूत्राने कोरोना बरा करण्याचा दावा केला होता. याचवेळी मध्य प्रदेश काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी साध्वी प्रज्ञा कोरोना पॉझिटिव्ह ((Corona Positive)) असल्याचे ट्विट केले. त्यांनी लिहिले की, गोमूत्र सेवन करून, दिवसातून पाच वेळा हनुमान चालिसाचे पठण करून आणि अल्कोहोलचे प्रमाण औषध म्हणून सांगणाऱ्या भोपाळच्या खासदाराला कोरोना झाल्याची (Corona Positive) बातमी फार आश्चर्यकारक आहे? देव त्यांना लवकर बरा करो. त्यांनी सांगितलेले उपाय त्यांनी स्वतः वापरले नाहीत असे दिसते.
Web Title: Sadhvi Pragya Singh Thakur Bjp Corona Positive Congress Madhya Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..